प्रा.जीएन साईबाबांच्या अडचणीत वाढ; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द | पुढारी

प्रा.जीएन साईबाबांच्या अडचणीत वाढ; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा तसेच इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यासह इतर आरोपींना आरोपमुक्त करण्याचा निर्णय रद्द केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर साईबाबा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

२०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा तसेच इतर पाच आरोपींना आरोपमुक्त केले होते. दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने साईबाबा यांच्या विरोधात नक्षवाद्यांसोबत संबंध असल्याप्रकरणी नव्याने विचार करावा, असे उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

२०१४ मध्ये नक्षवाद्यांसोबत संबंध असल्याप्रकरणात साईबाबाला अटक करण्यात आली होती. सध्या ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. व्हील चेअरच्या मदतीने साईबाबा दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद महाविद्यालयात इंग्लिश शिकवायचे. त्यांच्या विरोधात नक्षवाद्यांसोबत संबंध तसेच देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करीत तात्काळ कारागृहातून सोडण्याचे आदेश दिले होते. पंरतु, सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button