महाराष्ट्रातील सहा बस चालकांना 'हिरोज ऑन द रोड' पुरस्कार | पुढारी

महाराष्ट्रातील सहा बस चालकांना 'हिरोज ऑन द रोड' पुरस्कार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या अंडरटेकिंगच्या (एएसआरटीयू) वतीने ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून देशभरातील ४२ चालकांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ६ चालकांचा त्यात समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. घोडके किसन रामभाऊ (३६ वर्ष अपघातमुक्त सेवा) आणि मोहम्मद रफिक अब्दुल सत्तार मुल्ला (२९ वर्ष अपघातमुक्त सेवा) अशी गुणवंत चालकांची नावे आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवंड (२६ वर्ष अपघातमुक्त सेवा), सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील आवटे राजेंद्र महादेव (२५ वर्ष अपघातमुक्त सेवा), पुणे महानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (२४ वर्ष अपघातमुक्त सेवा), बेस्ट सेवेतील गिरीराजशंकर लालताप्रसाद पांडे (२१ वर्ष अपघातमुक्त सेवा) यांचा नुकताच गौरव करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button