Jammu-Kashmir : शोपियानमध्‍ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्‍मा

Jammu-Kashmir : शोपियानमध्‍ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्‍मा

जम्मू-कश्मीरच्या ( Jammu-Kashmir )  पुंछ सेक़्‍टरमधील डेरा की गली परिसरात सोमवारी झालेल्‍या चकमकीत पाच भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्‍कराने २४ तासांमध्‍ये दहशतवाद्यांचा सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. ( Jammu-Kashmir )  शोपियानमध्‍ये तीन दहशतवाद्यांचा खात्‍मा केला. या कारवाईनंतर मोठा शस्‍त्रसाठाही जप्‍त केला आहे.

( Jammu-Kashmir ) तिन्‍ही दहशतवादी हे लष्‍कर -ए-तोयबाचे

या कारवाईची माहिती देताना जम्‍मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले की, शोपियानमधील तुलरन परिसरात दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती मिळाली. येथे शोध मोहिम राबविण्‍यात आली. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्‍याचे आवाहन केले. मात्र त्‍यांनी  जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही जोरदार प्रत्‍युत्तर दिले. चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

तिन्‍ही दहशतवादी हे लष्‍कर -ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते. यामधील एकाची ओळख पटली आहे.  मुख्‍तार शाह असे त्‍याचे नाव आहे. ताे गांदेरबलमधील रहिवासी आहे. बिहारमधील एका फेरीवाल्‍या खून प्रकरणातील तो आरोपी होता, असेही विजय कुमार यांनी सांगितले . चकमकीनंतर मोठ्या प्रमाणावर शस्‍त्रासाठाही जप्‍त केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पुंछमध्ये झाले होते पाच जवान शहीद

जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरमध्ये (Poonch Encounter) सोमवारी झालेल्‍या चकमकीत ५ जवान शहीद झाले होते. या एक अधिकारी (junior commissioned officer- JCO) आणि चार जवानांचा समावेश हाेता . जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरच्या (Poonch Encounter) सूरनकोट भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच जवान शहीद झाले आहेत. याआधी साेमवारी सकाळी अनंतनाग आणि बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news