IT Raid : अखेर ‘डायनामिक्स’मधून आयकरचे पथक परतले | पुढारी

IT Raid : अखेर ‘डायनामिक्स’मधून आयकरचे पथक परतले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती औद्योगिक वसाहतीतील श्रायबर डायनामिक्स कंपनीत तपासणीसाठी गुरुवारी (दि. ७) आलेले पथक अखेर सोमवारी (दि. ११) मध्यरात्री अडीच वाजता कंपनीतून बाहेर पडले. कंपनीत नेमकी कशाची तपासणी केली यासह अन्य तपशील देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. ( IT Raid )

गेले साडेचार दिवस आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडून येथे कागदपत्रांची व आर्थिक स्थितीची तपासणी केली जात होती. गुरुवारी काटेवाडीतील एका व्यक्तीच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तोवर दुसरे पथक श्रायबर डायनामिक्समध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात आले. गेले चार दिवस माध्यमांचे प्रतिनिधी कंपनीसमोर तळ ठोकून होते. परंतु त्यांना कोणतीही माहिती मिळाली नव्हती. सोमवारी पहाटे हे पथक काम संपवून परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या हाती नेमके काय लागले हे येत्या काही दिवसांत कळेल. ( IT Raid )

Back to top button