ठाणे : उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण | पुढारी

ठाणे : उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

लखीमपूरा घटनेच्या निषेधार्थ महाराष्‍ट्र बंदची हाक देण्‍यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी ठाण्‍यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस रस्‍त्‍यावर उतरली. बाजारपेठेत एकत्र फिरून त्‍यांनी दुकाने बंद केली. यानंतर रिक्षा वाहतूक बंद करण्‍यासाठी स्टेशन परिसरात शिवसेनेच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात आले. यावेळी त्‍यांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केल्‍याचा एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठाण्यात बंदसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले. जांभळी नाका ते स्टेशन परिसर, नौपाडा या भागात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. तसेच रिक्षा चालकांना मारहाण करत रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यांना गाडीत बसवले. यानंतर त्यांना मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी मज्जाव केला. बंदमध्ये सहभागी झालेल्या मोठे पदाधिकारी बाजूला राहिले असून, छोट्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून चोप मिळाला.

हेही वाचलं का?

Back to top button