हिंगोली : औंढा नागनाथ उपबाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव घसरले | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ उपबाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव घसरले

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील उपबाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. सोयाबीनला सध्याच्या स्थितीमध्ये ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे.

तीन आठवड्यापासून औढा नागनाथ तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टीजन्य पाऊस पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील चार महिन्यात सोयाबीनला अकरा हजार रुपये भाव होता. मात्र, आता सोयाबीनचा भाव निम्म्यावर येऊन ठेपला आहे.

सध्या कणकण वाळलेल्या सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये भाव तर ओल्या सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव आहे. सध्या सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी दिसून येत आहे.

औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. तसेच राज्य शासनाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने विनाअट सरसगट मदत शेतकऱ्याला करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या पावसामुळे सोयाबीनचे खुपच नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का?

पाहा व्हिडिओ : तरूण पिढी, महिलांच्या विचारांना पंख देणारी समाजसेविका | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत विशेष मुलाखत

Back to top button