दिल्‍ली अबकारी धोरण घोटाळा, ‘ईडी’च्‍या पुरवणी आरोपपत्रावर होणार २४ रोजी सुनावणी | पुढारी

दिल्‍ली अबकारी धोरण घोटाळा, 'ईडी'च्‍या पुरवणी आरोपपत्रावर होणार २४ रोजी सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यावर आता २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ‘ईडी’ने राजेश जोशी, राघव मगुंटा तसेच गौतम मल्होत्रा यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात एकूण आठ आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्‍ये तीन व्यक्ती आणि पाच कंपन्यांना आरोपी करण्यात आले आहे.

आरोपपत्राची प्रत सर्व आरोपींना देण्यात आल्याची माहिती ‘ईडी’ सूत्रांनी दिली. दरम्यान जोशी, मगुंटा आणि मल्होत्रा यांच्या न्यायालयीन कोठाडीत वाढ करण्यात आली आहे. ‘ईडी’ने ७ फेब्रुवारी मल्होत्रा, जोशी यांना ८ फेब्रुवारीला आणि मगुंटा यांना १० फेब्रुवारीला अटक केली होती. आबकारी धोरण घोटाळ्यासंदर्भातील मुख्य प्रकरणावर ‘ईडी’च्या विशेष राऊज एव्हन्यू न्यायालयात १० मे ला सुनावणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button