मोठी दुर्घटना : उ. प्रदेशमध्‍ये ट्रॉली नदीत कोसळली; १४ ठार, २५ जखमी

मोठी दुर्घटना : उ. प्रदेशमध्‍ये ट्रॉली नदीत कोसळली; १४ ठार, २५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर जिल्‍ह्यात आज ( दि. १५ ) दुपारी मोठी दुर्घटना घडली. ४२ जणांनी भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली पुलावरून थेट नदी पात्रात नदीत कोसळली. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून, २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

या दुर्घटनेबाबत शाहजहानपूरचे पोलिस अधीक्षक एस. आनंद यांनी सांगितले की, "अजमतपूर गावात भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. दोन ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून पाणी कार्यस्‍थळी घेवून जाण्‍यात येणार होते. पाणी भरल्यानंतर सर्वजण गावी परत येत होते. यावेळी एका ट्रॅक्‍टर चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले. ४२ जणांनी भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली थेट पुलावरून खाली कोसळली. नदी पात्रात पाणी नसले तरी उंचावरुन  ट्रॉली खाली कोसळल्‍याने अनेकांचा जागीच मृत्‍यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळ धाव घेतली. तत्‍काळ स्‍थानिकांच्‍या मदतीने मदतकार्य सूरु करण्‍यात आले.  या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्‍यू झाल्‍या आहे. वरिष्‍ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत."

जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. सर्व मृत सुनौरा गावातील आहेत.

मृतांच्‍या कुटुंबीयांना २ लाख रुपये मदत : मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

या भीषण दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्‍याची घोषणा त्‍यांनी केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news