अमृतपाल सिंग (संग्रहित छायाचित्र)
Latest
अमृतपाल सिंगचा मुख्य सहकारी जोगा सिंग अटकेत, पंजाब पोलिसांचे मोठे यश
पुढारी ऑनलाई डेस्क : 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग याचा मुख्य सहकारी जोगा सिंग याला अटक केली आहे. त्याला शनिवारी सरहिंद येथे अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक नरिंदर भार्गव यांनी माध्यमांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना पोलीस महानिरीक्षक नरिंदर भार्गव यांनी सांगितले की, 'अमृतसर-ग्रामीण आणि होशियारपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अमृतपाल सिंगच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. जोगा सिंग असे आरोपीचे नाव आहे. त्याला सरहिंद येथून अटक करण्यात आली आहे. जोगा सिंग १८ ते २८ मार्चपर्यंत अमृतपालसोबत वास्तव्यास होता. सिंग यांनीच अमृतपालला २७ मार्चला पंजाबमध्ये परत आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
- मोठी दुर्घटना : उ. प्रदेशमध्ये ट्रॉली नदीत कोसळली; १४ ठार, २५ जखमी
- अपघाती मृत्यू झालेल्या पालकांची कमावती मुलेही ठरतात नुकसान भरपाईसाठी पात्र : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय
- Karnataka assembly elections 2023 | कर्नाटक निवडणूक- काँग्रेसकडून ४३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अथणीतून लक्ष्मण सवदी यांना तिकीट

