Poonch Encounter : जम्मू- काश्मीरच्या पुंछमध्ये चकमक, पाच जवान शहीद - पुढारी

Poonch Encounter : जम्मू- काश्मीरच्या पुंछमध्ये चकमक, पाच जवान शहीद

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन

जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरमध्ये (Poonch Encounter) सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु आहे. या चकमकीत ५ सुरक्षा जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. यात एक अधिकारी (junior commissioned officer- JCO) आणि चार जवानांचा समावेश आहे. याआधी आज सकाळी अनंतनाग आणि बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरच्या (Poonch Encounter) सूरनकोट भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच जवान शहीद झाले आहेत.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी एलओसी ओलांडून चमरेर जंगलापर्यंत आले होते. ते जंगलातून बाहेर पडले नाहीत. त्यांना जवानांनी चोहोबाजुने घेरले आहे. येथे अद्याप चकमक सुरु आहे. जंगलात तीन ते चार दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली आहे.

बंदीपोरामध्ये चकमक, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी ठार

बंदीपोरा जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका चकमकीत लष्कर ए तोयबाचा दहशतवादी ठार झाला. इम्तियाज अहमद दार असे त्याचे नाव असून तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याचा शाहगुंड बंदीपोरा येथे झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button