

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्यावर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे. जाणून घेवूया सिब्बल यांनी ट्विटरवर काय म्हटलं आहे याविषयी…
कपिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे की, "भगवान रामाने त्याग, सत्य आणि प्रामाणिकपणा निवडला. बाळासाहेबांनीही ही वैशिष्ट्ये आत्मसात केली. बाळासाहेबांचा वारसा कारस्थानी, संधिसाधू, पाठीराखे कधीही पुढे चालवू शकत नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार, खासदारांसह सध्या अयोध्या दौर्यावर गेले होते. रविवार दि. ९ रोजी त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी शरयू नदीवरील महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या हा दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. आपली विचारधारा हिंदुत्ववादी आहे. अयोध्येतून नवीन ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या राज्यात जाऊ आणि जनतेची सेवा करू. २०२४ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा :