Corona Update : कोरोनाचा वाढता संसर्ग! तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉक ड्रिल

Corona Update : कोरोनाचा वाढता संसर्ग! तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉक ड्रिल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील बहुतांश भागात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता, पुन्हा नियम कडक करण्यात येवू लागले आहेत. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे, तर अनेक राज्यांनी सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलीक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी  आढावा घेण्यासाठी सोमवार (दि.१०) आणि मंगळवारी (दि.११) देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे. (Corona Update)

कोरोना संक्रमणाच्या  पार्श्वभूमीवर, हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना संबधित नियमावली पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनाने तात्काळ  सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. त्याचबरोबर, उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह आढळलेले नमुने पाठवण्यासही सरकारी आदेशात सांगण्यात आले आहे.

दोन दिवस सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या तयारीची चाचणी होणार 

कोरोना संसर्गामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉक ड्रिल होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाचे प्रधान आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासमवेत आढावा बैठकीत तयारीची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

Corona Update : घाबरू नका, सतर्क राहा : मांडविया

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज (दि.१०) झज्जर येथील एम्सला भेट देणार असून तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यांनी लोकांना घाबरू नका, सतर्क राहण्यास सांगितले आहे. मांडविया म्हणाले, अलीकडेच झालेल्या संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक उपकरणे आणि पुरवठा यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या तयारीचा साप्ताहिक आढावाही घेतला जात आहे.

दिल्लीत संसर्गामुळे एका दिवसात चार मृत्यू

राजधानी दिल्लीत रविवारी (दि.९) चार जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून ६९९ नवीन रुग्ण आढळले आहेत. या वर्षातील एका दिवसात कोरोनामुळे झालेला हा सर्वाधिक मृत्यू आहे. ४६७ रुग्ण बरे झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय प्रकरणे २,४६० पर्यंत वाढली आहेत. त्यापैकी १२६ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यात ५३ आयसीयूमध्ये, ८ व्हेंटिलेटरवर आणि ३३ ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news