Rainfall Forecast : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ८० टक्के अवकाळी पावसाची नोंद | पुढारी

Rainfall Forecast : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ८० टक्के अवकाळी पावसाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या एक महिन्यापासून अवकाळी पावसाने देशभरात थैमान घातले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान देशभरात २८ टक्के पावसाची नोंद (Rainfall Forecast) झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात ८० टक्के अवकाळी पावसाची नोंद झाली असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

अवकाळीचा तडाखा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह देशभारतील अनेक राज्याला बसला आहे. जम्मू काश्मीर, ईशान्य भारत, कर्नाटक आणि केरळचा काही भाग वगळता देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्राला अवकाळीचा फटका (Rainfall Forecast) बसला असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.

Rainfall Forecast : अवकाळी गारपीटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान

गेल्या एक महिन्यापासून देशभरात ढगांच्या गडगटांसह सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे देशभरातील ज्वारी, हरभरा, गहू, मका, फळबागा यांसारख्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे देखील भारतीय हवामान खात्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

येत्या काही दिवसात कमाल तापमानात वाढ

दरम्यान पुढचे काही दिवस भारतातील अनेक भागांतील कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. बांगलादेशच्या ईशान्य भागात उष्णकटिबंधीय वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात देशातील काही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button