West Bengal Violence : प. बंगालमध्ये तिसऱ्या दिवशीही तणाव; इंटरनेट बंद, हुगळीत कलम १४४ लागू | पुढारी

West Bengal Violence : प. बंगालमध्ये तिसऱ्या दिवशीही तणाव; इंटरनेट बंद, हुगळीत कलम १४४ लागू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर तिसऱ्या दिवशीही तणाव पाहायला मिळाला. हुगळी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. भागात  इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. पोलिस विविध भागात छापे टाकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. लोकांना शांततेचे आवाहन केले जात आहे. (West Bengal Violence)

West Bengal Violence : पोलिसांची गस्त वाढवली, ठिकठिकाणी तपासणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंदननगर पोलीस आयुक्तालयाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भागातील सेवा बंद करण्यात आली आहे. रिसडा आणि महेश परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आज सकाळी (दि.३) रिसदा पोलीस ठाण्याच्या वतीने शांततेचो आवाहन करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान भाजपने या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी तीन वाजता राज्यभर निषेधाची घोषणा केली आहे.

 

हेही वाचा

Back to top button