Anil Jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीची याचिका हायकोर्टाने फेटाळली | पुढारी

Anil Jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाचखोरी आणि खंडणीचा आरोप करत मलबार हिल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या दाखल केलेल्या तक्रारीवरून वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी फॅशन डिझायनर अनिक्षा यांच्यावर गुन्हे दाखल करत, त्यांना अटक करण्यात आली होती. पंरतु अनिल यांनी बेकायदेशीर अटकेचा आरोप करत न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र बुकी अनिल जयसिंघानी याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर देत व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ मेसेज आणि अन्य मेसेज पाठवून १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधील कलोल येथून गुजरात पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणात आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

२०१५ मध्ये उल्हासनगरातील कुख्यात क्रिकेट बुकी अनिल जसयसिंघानी याला त्याच्या गोलमैदान परिसरातील घरावर ईडीने छापा टाकत ताब्यात घेतले होते. हा कारवाई आयपीएल क्रिकेट मॅचमधील सट्टा बाजार आणि बेकायदेशीर मनी लॉड्रिंग प्रकरणाशी संबंधित होती. अनिल जयसिंघानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. त्याने अनेकवेळा निवडणूक लढली. पण तो जिंकू शकला नाही. अनिल जयसिंघानीवर क्रिकेट बेटिंगचे अनेक गंभीर गुन्हे उल्हासनगर व मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणूक, खोटे दस्तऐवज सादर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर न्यायालयाने उल्हासनगर कॅम्प २ येथील गोल मैदान परिसरात मोहन लाईफ स्टाईल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेला फ्लॅट १८ ऑक्टोबर २०१८ सील केला होता. याच फ्लॅटमध्ये २०१९ मध्ये चोरी झाली होती. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर आहे.

हेही वाचा:

Back to top button