Khalistani Organization : खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करा; ब्रिटन खासदाराच्या पोलिसांना सूचना | पुढारी

Khalistani Organization : खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करा; ब्रिटन खासदाराच्या पोलिसांना सूचना

पुढारी ऑनलाईन : भारतातील खलिस्तान समर्थक ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला ताब्यात घेण्यासाठी पंजाब पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल (दि.20) लंडनमधील खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय उच्चायुक्तालयावरील भारताचा झेंडा ओढून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संतप्त खलिस्तानी समर्थकांनी जोरदार घोषणा केल्या. यावर ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी सोमवारी(दि.२०) घेतलेल्या एका बैठकीत सांगितले आहे की, यूकेमध्ये शीख समुदाय हा अत्यल्प प्रमाणात आहे. यातील काहीच शीख खलिस्तानचे समर्थन करतात. तर बहुसंख्य शीख हे खलिस्तानी कृतींना पूर्णपणे नाकारतात. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडल्यास खलिस्तानी समर्थकांना अटक करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश लंडन पोलिसांना दिले आहेत.

पंजाबमधील फुटीरतावादी घटकांवरील कारवाईचा निषेध करणाऱ्या खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांच्या गटाने रविवारी दुपारी लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावरील राष्ट्रध्वज खाली पाडला. दरम्यान, खासदार ब्लॅकमन यांनी या घटनेचा त्वरीत निषेध करत, भारतीय तिरंग्याचा अनादर “लज्जास्पद” असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यूकेमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि उपउच्चायुक्त सुजित घोष यांनी या हल्ल्यासंदर्भात इंडिया हाऊसमध्ये संबंधित भारतीय समुदायाच्या नेत्यांची बैठक घेत, कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा:

Back to top button