

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात खलिस्तान समर्थकांची ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आली आहेत. यामध्ये कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह यांच्या ट्विटर अकाउंटचाही समावेश आहे. कॅनडाच्या कवयित्री रुपी कौर, स्वयंसेवी संस्था युनायटेड शीख आणि कॅनडास्थित कार्यकर्ते गुरदीप सिंह सहोता यांची ट्विटर अकाउंट्सही भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावर कारवाई होत असताना ट्विटरने हे पाऊल उचलले आहे.
पंजाब पोलिसांना चकवा देऊन खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान खलिस्तान समर्थकांविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. सरकारने सोमवारी भारतातील खलिस्तान समर्थकांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केली आहेत. यामध्ये कॅनडाच्या काही नेत्यांसह सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा :