Amritpal Singh Update: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग फरार घोषित

पुढारी ऑनलाईन : खलिस्तान समर्थक आणि ‘वारस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्यासह त्याच्या समर्थकांवर पंजाब सरकार आणि पोलिसांकडून राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी आज ( दि. १९ ) अमृतपाल सिंगला फरार घोषित केले आहे. शनिवारी (दि.१८) सायंकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु ही कारवाई गोपनियरित्या केली जात असल्याने पंजाब पोलिसांनी अटकेबाबत कोणताही दुजोरा दिला नाही. आम्ही कारवाई करत असून, कोणत्याही क्षणी अमृतपाल सिंग याला अटक होऊ शकते, असे पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
अमृतपाल सिंग याला पकडण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, दरम्यान पंजाब पोलिस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वतीने जालंधरमध्ये फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी सुमारे २० ते २५ किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र तो पसार झाला. दरम्यान काही शस्त्रे आणि दोन कार जप्त करण्यात आली आहे. अमृतपाल सिंगच्या शोधार्थ शोधमोहिम सुरू असून, आम्ही लवकरच त्याला अटक करू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे, असे जालंधरचे पोलिस प्रमुख के.एस. चहल यांनी सांगितले.
Punjab police seized two cars of ‘Waris Punjab De’ chief Amritpal Singh as efforts are underway to nab him. He was declared a fugitive by the police yesterday. pic.twitter.com/1cpSaxoQrf
— ANI (@ANI) March 19, 2023
पंजाबसह शेजारील राज्यात हायअलर्ट
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी पोलिसांकडून मोठया प्रमाणात कारवाई सुरू आहे, अमृतपालचे वडिलोपार्जित गाव असलेल्या जल्लू खेडा येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निदर्शने आणि हिंसाचार टाळण्यासाठी पंजाबमधील काही जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पंजाब, हिमाचल आणि शेजारच्या काही राज्यांमध्ये पंजाब पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारपर्यंत इंटरनेट सेवा बंद
अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी राज्य पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी एजन्सींकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ही परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने हताळण्यासाठी आणि कायदा सुव्यस्था लक्षात घेता, पंजाब सरकारने इंटरनेट आणि दूरसंचार सेवेवर निर्बंध आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि सुरक्षेच्या दृष्टीने पंजाबमधील मोबाइल, इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या डोंगल सेवा (व्हॉईस कॉल वगळता) पंजाबच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील या सर्व सेवा 20 मार्चपर्यंत (12:00 तास) बंद करण्यात आल्या आहेत. पुढील १२ तासांसाठी राज्यातील सर्व इंटरनेट आणि दूरसंचार सेवांवर पंजाब सरकारकडून निर्बंध आणण्यात आले आहेत.
हेही वाचा:
- नोटीसला उत्तर न दिल्याने राहुल गांधींच्या घरी धडकली दिल्ली पोलिस; काय आहे प्रकरण?
- ‘रॅकून’ कुत्र्यामुळे बळावला कोरोनाचा प्रादुर्भाव; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा