संसदेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ; राज्यसभा-लोकसभेचे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब | पुढारी

संसदेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ; राज्यसभा-लोकसभेचे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समुहाच्या प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज देखील दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी माफी मागावी, या मागणीवर भाजप ठाम आहे. राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर भारताचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे भाजपचे म्हणणे आहे. तर राहुल गांधी यांनी काही चुकीचे बोलले नाहीत, मग त्यांनी माफी का मागावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे. आज संसदेत काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून घोषणाबाजी केली. यामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला अवघे दोन आठवडे उरले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलला संपणार आहे. केंद्र सरकारला अर्थसंकल्प पास करायचा आहे. नियमानुसार, केंद्रीय अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, बजेट मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार या आठवड्यात प्रयत्न करू शकते.

हेही वाचा : 

Back to top button