

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू राज्यातील तिरिचिरापल्ली जिल्ह्यातील तिरुवासीजवळ त्रिची-सालेम NH वर आज पहाटे (दि.१९) भीषण अपघात झाला. लॉरी आणि मिनी व्हॅन यांची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या सहा जणांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मिनी व्ह्रॅनमध्ये नऊ व्यक्ती होत्या. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये चार पुरुषांचा, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तीनजण जखमी असून त्यांच्यावर त्रिची सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Tamilnadu)
हेही वाचा