Rajinikanth met Uddhav Thackeray | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट | पुढारी

Rajinikanth met Uddhav Thackeray | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत यांनी आज शनिवारी (दि.१८) उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. ही कोणतीही राजकीय भेट नसून रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत. रजनीकांत यांनी कौटुंबिक नातेसंबधांमुळे ठाकरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. रजनीकांतजी पुन्हा एकदा मातोश्रीवर आल्याने आम्हाला खूप आनंद झाला, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. (Actor Rajinikanth today met Uddhav Thackeray at Matoshree residence in Mumbai)

सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आले होते. बीसीसीआयने रजनीकांत यांना त्यासाठी विशेष निमंत्रण दिले होते. यादरम्यान त्यांनी मातेश्रीवर जात ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली.

हे ही वाचा :

Back to top button