J&K : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; तिघांचा मृत्यू | पुढारी

J&K : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; तिघांचा मृत्यू

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मिरमध्ये (J&K) मंगळवारी ३ दहशतवादी घटना घडल्या. केवळ दोन तासांच्या या दहशतवादी घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी घटनांवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनांवर शोक व्यक्त केला आहे.

पहिली घटना श्रीनगरमधील इक्बाल पार्कजवळ घडली असून त्यात काश्मिरी पंडित समुदाय आणि बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबाजवळ आणखी एक घटना घडली. त्यात दहशतवाद्यांनी फेरिवाल्यांवर गोळीबार केला.

उत्तर काश्मिरच्या बांदिपोर जिल्ह्यातील हाजीन भागात घडली, ज्यात अज्ञात लोकांनी एका मोहम्मद शफी या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनांची माहिती मिळताच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.

या घटनांबद्दल माहिती देताना आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणतात की, “मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. इक्बाल पार्कजवळ दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले औषध विक्रेता आणि काश्मिरी पंडित माखन लाल यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.”

या घटनांवर उपराज्यपाल मनोज सिन्हा शोक व्यक्त करत म्हणाले की, “मी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी त्यांच्या नापाक योजनांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत आणि अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल.”

माजी मुख्यमंत्री (J&K) ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “या दुःखाच्या परिस्थितीत मी मृतांच्या कुटुंबासोबत आहे. ही दु:खद बातमी आहे.” तर, बिंदरू यांच्या कुटुंबासाठी माझी संवेदना. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, “मी या हत्येचा निषेध करते, अशा हिंसक घटनांना समाजात स्थान नाही.”

पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या तरुणाईने मांडला स्वच्छतेचा जागर

Back to top button