नुपूर सारिका : सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून गेली होती पार्टीत! | पुढारी

नुपूर सारिका : सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून गेली होती पार्टीत!

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Cruise Drugs Case) अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी क्रूझवरील रेव्ह पार्टीवर कारवाई झाली त्यावेळी क्रूझवर १८०० लोक होते. मात्र, चौकशीनंतर आठजण वगळून इतर सर्वांना जाऊ देण्यात आले. आठजणांमध्ये आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका (Nupur Sarika), इस्मीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोपित चोपडा यांचा समावेश आहे. या सर्वांकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएम ड्रग्जच्या २२ गोळ्या, ५ ग्रॅम एमडी डग्ज आणि १ लाख ३३ हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली.

कोणाच्या कॉलरमध्ये, तर कोणाच्या अंडरवेअरमध्ये ड्रग्ज…

Cruise Drugs Case : अरबाज मर्चंटने चपलामध्ये लपवून ठेवलेले चरस सापडले. कोणी कॉलरमध्ये, तर कोणी आयलेन्स बॉक्समध्ये, अंडरवेअर, पॅंटच्या शिलाईत आणि लेडीज पर्सच्या हँडलमध्ये ड्रग्ज लपवले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. नुपूर सारिका ((Nupur Sarika) दिल्लीत फॅशन डिझायनिंगचे काम करते. एका वृत्तानुसार, नुपूरला ड्रग्ज मोहकने दिले होते. तिने ते सॅनिटरी पॅडमध्ये लपवून क्रूझवरील रेव्ह पार्टीत नेले होते.

इस्मीत दिल्लीतील आहे. त्याचा हॉटेल उद्योग आहे. त्याच्याकडे रेव्ह पार्टीत १४ एमडीएमएच्या गोळ‍्या मिळाल्या. मोहकदेखील दिल्लीचा असून तो आयटी प्रोफेशनल आहे. त्याच्याकडे परदेशात काम केल्याचा अनुभव आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मोहक स्वतः पार्टीत ड्रग्ज घेऊन गेला नव्हता. त्याने मुंबईतून एकाकडून ड्रग्ज खरेदी केले होते. त्याने नुपूरला ड्रग्ज सॅनिटरी पॅडमध्ये लपवून नेण्यास सांगितले होते.

आयलेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज लपवले….

विक्रांतदेखील दिल्लीचा आहे. एनसीबीने त्याच्याकडून ५ ग्रॅम मेफेड्रोन आणि १० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. तर गोमित दिल्लीचा असून तो हेअर स्टायलिस्ट आहे. सेलिब्रिटीज मेकअपसाठी त्याच्याकडे संपर्क करायचे. एका वृत्तानुसार त्याने आयलेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज लपवून पार्टीत नेले होते. एनसीबीने त्याच्याकडून ४ एमडीएमए गोळ्या आणि काही प्रमाणात कोकेनही जप्त केल्याची माहिती पुढे आली.

मुनमुन धमेचा एक फॅशन मॉडेल आहे. ती एका उद्योजक कुटुंबातील आहे. ती मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या भावासोबत दिल्लीत राहते. ३९ वर्षीय मुनमुनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. तिच्याकडे ५ ग्रॅम चरस सापडले.

हे ही वाचा :

Back to top button