satara highway accident : पुणे -बंगळूर महामार्गावर सातारा येथे ट्रॅव्हल्स पलटी | पुढारी

satara highway accident : पुणे -बंगळूर महामार्गावर सातारा येथे ट्रॅव्हल्स पलटी

सातारा : पुढारी वृत्तसेवा

पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जवळ वाढे फाटा येथे आज पहाटे प्रवासी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स पलटी झाली. (satara highway accident) या दुर्घटनेत सुमारे सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, प्रवासी ट्रॅव्हल्स पुणेहून कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. सातारा नजिक वाढे फाटा येथे ट्रॅव्हल्स आल्यानंतर कंटेनरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला व ट्रॅव्हल्स पलटी झाली. (satara highway accident) अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही.

Back to top button