समाजवादी पार्टीला झटका, अखिलेश यादवांचा निकटवर्ती जुगेंद्रसिंहला अटक | पुढारी

समाजवादी पार्टीला झटका, अखिलेश यादवांचा निकटवर्ती जुगेंद्रसिंहला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  उत्तर प्रदेश पोलिसांनी होळीच्‍या दुसर्‍या दिवशी समाजवादी पार्टीला ( सपा ) मोठा झटका दिला आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा निकटवर्ती, एटा जिल्‍ह्यातील समाजवादी पार्टीचा नेता जुगेंद्र सिंह यादव याला अटक करण्‍यात आली आहे. बेकायदा जमीन बळकावल्‍याप्रकरणी विविध गुन्‍हे दाखल असणार्‍या जुगेंद्रसिंह मागील एक वर्षापासून फरार होता. त्‍याचा मोठा भाऊ व सपाचा माझी आमदार रमेश्वर सिंग याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

स्थानिक पोलिसांनी जुगेंद्र सिंह यादव यांच्‍यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जुगेंद्रसिंह आणि रमेश्‍वर यांच्यावर कोतवाली नगर येथे गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून दोघेही फरार होते. न्‍यायालयाने दोघांवर कारवाईसाठी नोटिसा जारी केल्या होत्‍या. माजी आमदार रामेश्वरसिंग यादव याला ९ जून २०२२ रोजी आग्रा येथे पोलिसांनी अटक केली होती. तो सध्‍या कारागृहात आहे.

जुगेंद्र सिंह हा मागील एका वर्षापासून फरार होता. जुगेंद्रसिंह आणि रमेश्‍वर यादव यांच्‍यावर बेकायदेशीर जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी अनेक गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होते. १ मे २०२२ रोजी गँगस्टर अ‍ॅक्ट कोर्टाकडून त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button