Stock Market Closing | सेन्सेक्स ५४१ अंकांनी घसरून ६० हजारांखाली, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?

Stock Market Closing | सेन्सेक्स ५४१ अंकांनी घसरून ६० हजारांखाली, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?
Published on
Updated on

Stock Market Closing : मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरवाढीच्या भूमिकेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहे. यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज (दि.९) घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी घसरून ६०,१०० वर होता. तर निफ्टी १७,६८२ वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ५४१ अंकांच्या घसरणीसह ५९,८०६ वर बंद झाला. तर निफ्टी १६४ अंकांनी घसरून १७,५८९ वर स्थिरावला.

हे शेअर्स वधारले, हे घसरले

आजच्या व्यवहारात टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एलटी, नेस्ले, एचडीएफसी, एशियन पेंट्स हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो, मारुती, रिलायन्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टायटन, टीसीएस, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले.

मेटल स्टॉक्स ५ टक्क्यांपर्यंत वाढले

आज मेटल स्टॉक्स ५ टक्क्यांपर्यंत वाढले. यात हिंदुस्तान कॉपर (१.२८ टक्के वाढ), हिंदाल्को इंडस्ट्रीज (१.२६ टक्के वाढ), हिंदुस्तान झिंक (०.६१ टक्के वाढ), टाटा स्टील (१.८३ टक्के) यांचा समावेश होता. दरम्यान, निफ्टी ऑटो स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने खाली आले.

अदानींच्या स्टॉक्सची अशी राहिली कामगिरी

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. पण आज अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज ६.६ टक्क्यांपर्यंत घसरला. गेली ७ दिवस हा शेअर तेजीत होता. अदानींच्या इतर सर्व शेअर्सची कामगिरी : अदानी पोर्ट्स (-२.६८ टक्के), अदानी ग्रीन (५ टक्के), अदानी टोटल गॅस (५ टक्के), अदानी ट्रान्समिशन (५ टक्के), अदानी विल्मर (४ टक्के), एसीसी (-१४ टक्के), अंबुजा (-१.३ टक्के), एनडीटीव्ही (१.४ टक्के).

बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण

Nifty PSU Bank निर्देशांकात आज घसरण झाली. यात इंडियन बँक (-२.०९ टक्के), पंजाब अँड सिंध (-१.७३ टक्के), बँक ऑफ इंडिया (-१.५ टक्के), बँक ऑफ बडोदा (-०.७८ टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र (-०.७३ टक्के), एसबीआय (-०.५२ टक्के), युको बँक (-०.३७ टक्के), युनियन बँक (-०.१४ टक्के).

अमेरिका, आशियात संमिश्र व्यवहार

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने त्यांच्या अहवालात वाढती महागाई कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आर्थिक मंदीची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.२ टक्के घसरून ३२,७९८ वर बंद झाला. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.४ टक्के वाढून ११,५७६ वर स्थिरावला. आशियाई बाजारातही आज संमिश्र परिस्थिती आहे. चीनचा शांघाय कंपोझिट घसरला असून हाँककाँगचा हेंग सेंग निर्देशांक वाढला आहे. कोरियाचा कोस्पी खाली आला. तर जपानचा निक्केई निर्देशांक वधारला. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news