Maharashtra Budget 2023-2024 | असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : असंघटित क्षेत्रातील तीन कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. अशी घोषणा आज (दि.०९) उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्र्यांनी २०२३-२४ या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. Maharashtra Budget 2023-2024

दरम्यान, राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लेक-लाडकी' योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून केली केली. या योजनेंर्गत  पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये, इयत्ता चौथी ४००० रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ जागा पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील. Maharashtra Budget 2023-2024

Maharashtra Budget 2023-2024 : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी (दि.9) विधानसभेत राज्याचा 2023-2024 चा अर्थसकंल्प सादर करत आहेत. यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत असून त्यात राज्य सरकार आणखी ६ हजार रुपये घालणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील. याचा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आहे. तर याचा ६,९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयावर आधारित आहे. यात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास याचा समावेश असल्याचे फडणवीस म्हणाले. Maharashtra Budget 2023-2024


हे वचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news