पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारतात ते अनेक लोकांना भेटल्याचे वृत येत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गेट्स यांना खिचडीला फोडणी कशी द्यायची याचे धडे देत असलेला एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. आता बिल गेट्स यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एक रिक्षा चालवतानाचा आहे. हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी "चलती का नाम बिल गेट्स की गाडी" असं कॅप्शन देत शेअर केला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Bill Gates & Anand Mahindra)
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन, उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही शेअर करत असतात. आज त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते महिंद्रा ऑटोची लोकप्रिय इलेक्ट्रिक रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालवताना दिसत आहेत. या ट्विटवर युजर्सनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
बिल गेट्स यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर ट्रेओ गाडी चालवताना व्हिडिओ शेअर केला आहे. सुमारे काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ ७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 'बाबू, समझो इशारे, होरण पुकारे… पम-पम-पम' हे गाणे वापरण्यात आले आहे. या व्हिडिओला त्यांनी अशी कॅप्शन दिली आहे की, मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, जी एका पूर्ण चार्जवर 131 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे आणि 4 लोकांना वाहून नेण्यास सक्षम आहे. महिंद्रा सारख्या कंपन्या परिवहन उद्योगाच्या डीकार्बोनायझेशनमध्ये योगदान देत आहेत हे प्रेरणादायी आहे.
हेही वाचा