क्रुरतेचा कळस : पत्‍नीची हत्‍या करून केले ६ तुकडे; अन् मृतदेह पाण्याच्या टाकीत २ महिने ठेवला लपवून | पुढारी

क्रुरतेचा कळस : पत्‍नीची हत्‍या करून केले ६ तुकडे; अन् मृतदेह पाण्याच्या टाकीत २ महिने ठेवला लपवून

रायपूर (छत्‍तीसगढ) ; पुढारी ऑनलाईन माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेची हत्‍या करून तीच्या मृतदेहाचे तुकडे केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच आपल्‍या पत्‍नीची हत्‍या करून तीच्या मृतदेहाचे तुकडे केले असून, त्‍याने मृतदेहाचे तुकडे गेल्‍या दोन महिन्यांपासून पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते. पोलिसांनी घराच्या छतावर ठेवलेल्‍या पाण्याच्या टाकीतून महिलेच्या मृतदेहाचे सर्व सहा तुकडे तपासासाठी ताब्‍यात घेतले. संशयीत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीदरम्‍यान संशयीत आरोपीने सांगितले की, पत्‍नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्‍याने आपल्‍या पत्‍नीची हत्‍या केली.  पवन ठाकूर असे संशयीताचे नाव आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

असा झाला हत्‍येचा खुलासा

पोलिसांनी संशयीताला पवन ठाकुरला बनावट नोटांसह पकडले होते. यानंतर पोलिसांनी तपासाच्या कक्षा रूंदावल्‍या आणि आरोपीचा शोध सुरू केला. पोलिस जेंव्हा संशयीताच्या घराच्या छतावर पोहोचली, तेव्हा पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्‍याचे जाणवले. जेंव्हा पोलिसांनी टाकीचे टोपण उघडले तेंव्हा हत्‍येचा खुलाचा झाला. संशयीत पवन ठाकूरचे लग्‍न १० वर्षापूर्वी झाले होते. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्‍यांना दोन आपत्‍ये आहेत. ५ वर्षांची मुलगी तर ३ वर्षाचा मुलगा आहे.

संशयीताशी चौकशीत पोलिसांना मिळाली माहिती

चौकशीदरम्‍यान संशयीताने सांगितले की, तो त्‍याची पत्‍नी आणि दोन मुलांसह भाड्‍याच्या घरात राहत होता. त्‍याचा त्‍याच्या पत्‍नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणातून त्‍याने पत्‍नीचा ५ जानेवारी रोजी हत्‍या केली. यानंतर संशयीताने दोन्ही मुलांना त्‍यांच्या आजी-आजोबांजवळ तखतपूर येथे सोडले.

 

हेही वाचा :  

Back to top button