राहुल गांधी नवीन लूकमध्‍ये!, लंडनला पोहचताच ‘भारत जोडो’च्‍या लूकमध्‍ये बदल | पुढारी

राहुल गांधी नवीन लूकमध्‍ये!, लंडनला पोहचताच 'भारत जोडो'च्‍या लूकमध्‍ये बदल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्‍या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रे दरम्‍यान वाढलेले केस आणि दाढीमध्‍ये दिसत दिसले. त्‍याचा हा लूक बहुचर्चित ठरला होता. आता त्‍यांनी यामध्‍ये बदल केला आहे. इंग्‍लंडमधील क्रेंब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांचा नवीन लूक समोर आला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. (Rahul Gandhi new look )

काँग्रेसच्‍या नुकताच पूर्ण झालेल्‍या भारत जोडो यात्रे दरम्‍यान राहुल गांधी हे लांब केस आणि वाढलेल्‍या दाढीमध्‍ये दिसले. त्‍यांचा हा बदलेला लूक बहुचर्चित ठरला होता. आता केंब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्‍या राहुल गांधी हे ट्रिम केलेल्‍या दाढी आणि मिशा तसेच डोक्‍यावर कमी केलेले केस या नवीन लूकमध्‍ये दिसले. (Rahul Gandhi new look )

भारत जोडो संपूर्ण यात्रा काळात राहुल गांधी हे पांढर्‍या टी-शर्ट आणि ट्राउझरमध्‍ये दिसले. क्रेंब्रिजमधील कार्यक्रमात ते कोट-टायमध्‍ये दिसले. त्‍यांच्‍या नव्‍या लूकला सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

राहुल गांधी हे आठवडाभराच्‍या ब्रिटन दौर्‍यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात ते ‘२१ व्‍या शतकातील शिक्षण’ या विषयावर व्‍याख्‍यान देणार आहेत. केंब्रिज एमबीए कार्यक्रमात भारताचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे स्‍वागत करताना आम्‍हाला खूप आनंद होत आहे, असे केंब्रिज जेबीएस यांनी मंगळवारी ट्विट केले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button