Australian police : भारतीय नागरिकाची ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून गोळ्या घालून हत्या | पुढारी

Australian police : भारतीय नागरिकाची ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून गोळ्या घालून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नागरिक मोहम्मद रहमथुल्ला सय्यद अहमद ( वय. ३२) याची ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून गोळ्या घालून हत्या.  द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या  वृत्तानूसार मोहम्मद रहमथुल्ला सय्यद अहमद याने एका क्लिनरवर वार केल्याने त्याचबरोबर पोलिस अधिकाऱ्यांना चाकूने धमकावल्याच्या कारणास्तव त्याला पोलिसांनी ठार केले. ही घटना मंगळवारी (दि.२८) रात्री उशीरा घडली. ऑस्ट्रेलियातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या माहितीनूसार, मृत मोहम्मद  हा भारतातील तामिळनाडू राज्यातील असून तो ब्रिजिंग व्हिसावर ऑबर्न येथे राहत होता. वाचा सविस्तर बातमी. (Australian police)

माहितीनूसार, मोहम्मद रहमथुल्ला सय्यद अहमद ( वय. ३२) याने मंगळवारी (दि.२८) पहाटे १२.०३ वाजता सिडनीच्या पश्चिमेकडील ऑबर्न ट्रेन स्टेशनवर २८ वर्षीय क्लिनरवर चाकूने हल्ला केला.  पाच मिनिटांनंतर ऑबर्न पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला, नंतर पोलिस अधिकाऱ्यांना चाकूने धमकावले दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. सैय्यदवर पॅरामेडिक्सने घटनास्थळी उपचार केले. त्यानंतर त्याला वेस्टमीड रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान पहाटे १.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.

Australian police : पाचवेळा पोलिसांशी संवाद 

मोहम्मदची मानसिक आरोग्याची काय स्थिती होती याचा तपास यंत्रणेकडून केला जात आहे. त्याने पोलिसांशी यापूर्वी पाचवेळा वेगवेगळ्या कारणास्तव संपर्क केला आहे. हा संपर्क  गैर-गुन्हेगारी आणि कोविड संबंधित होता. NSW पोलिस सहाय्यक आयुक्त स्टु अर्ट स्मिथ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याच्या मानसिक आरोग्याची चौकशी करत आहोत. स्मिथ मोहम्मदने क्लिनरवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना धमकावले आमच्याकडे त्याला प्रतिसाद देण्यासाठी काहीच सेकंदांचा अवधी होता. आमच्याकडे त्याला मारण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्याकडे याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. माझा या अधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे.

हेही वाचा 

Back to top button