

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवसही अस्थिर आणि खराब गेला. सन्सेक्स ५८,९६२.१२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी १७,३०३.९५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०वर मंगळवारी बजाज अॅटो, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स यांचे शेअर्स वधारले. तर अदानी एंटरप्राईज, सिप्ला, अदानी पोर्टस, हिंडाल्को आणि एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपन्यांचे शेअर्स गडगडले.
वेदांता लिमिटेडच्या शेअर्स भाव गेली काही दिवस सातत्याने गडगडत आहे. १६ सप्टेंबर २०२०पासून विचार केला तर या कंपनीच्या शेअर्सची किंमत ८.८२टक्केंनी कमी आली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी वेदांताचा शेअर २६२ रुपये इतक्या खालच्या पातळीवर पोहोचला होता. पूर्ण वर्षाचा विचार केला तर वेदांताच्या शेअर्सची किंमत १३ टक्केंनी घसरली आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने म्हटले आहे की, "जर वेदांता समूह २ अब्ज डॉलरचा निधी जमवू शकले नाही, किंवा जर हिंदूस्तान झिंक लिमिटेडची विक्री होऊ शकली नाही तर कंपनीच्या क्रेडिट रेटिंगवर याचा ताण येऊ शकतो."
मंगळवारी निफ्टी अॅटो इंडेक्स सकाळच्या सत्रात १ टक्केंनी वधारला होता. बजाज अॅटो, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड या कंपन्यांच्या शेअर्सचे दर आज दिवसभरात ग्रीनमध्ये राहिले.
नॅशनल फार्मासिटिकल प्राईस अॅथॉरिटीने डायबेटिज, ब्लड प्रेशरसह इतर काही आजारांवरील ७४ औषधांच्या किमती निश्चित केल्याची घोषणा केली आहे. याचा फटका निफ्टी फार्मा इंडेक्सला बसला. या इंडेक्समध्ये असलेल्या २० पैकी १० औषध कंपन्याचे शेअर्स घसरले. सिप्ला, ग्लेनमार्क, बायोकॉन, अल्केम, डॉ. रेड्डीज या कंपन्यांना याचा फटका बसला. सिप्लाच्या शेअर्सची किंमत ३ टक्केंनी खाली होती.
महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स
अदानी एंटरप्राईज, सिप्ला, अदानी पोर्टस, हिंडाल्को आणि एचसीएल टेक्नॉलॉजी, वेदांता लिमिटेड
हेही वाचा