Meghalaya Nagaland Elections 2023 : मेघालय-नागालॅंड विधानसभा निवडणूक; मतदानाला सुरुवात

Meghalaya Nagaland Elections 2023 : मेघालय-नागालॅंड विधानसभा निवडणूक; मतदानाला सुरुवात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी (दि.२७) मतदान होत आहे. मेघालय आणि नागालँडमधील ११८ जागांसाठी ५५० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, परंतु यावेळी मेघालय आणि नागालँडमध्ये 59-59 जागांसाठी मतदान होत आहे.( Meghalaya Nagaland Elections 202 )

Meghalaya Nagaland Elections 2023 : मेघालयमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठे आव्हान

दरम्यान, मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी २१ लाखांहून अधिक मतदार सोमवारी(दि.२७) ३६९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यातील ५९ विधानसभा मतदारसंघांसाठी ३४९१ मतदान केद्रांवर मतदान होणार आहे. सोमवारी (दि.२७) सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. सत्तेत पुन्हा परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. दुर्गम आणि डोंगराळ भागात पायाभूत सुविधांचा अभाव हा यावेळच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे आरोपही एनपीपी सरकारसाठी मोठी समस्या बनले आहेत. याशिवाय जैंतिया आणि खासी हिल्समधील बेकायदेशीर कोळसा खाणीचा प्रश्नही निवडणुकीवर परिणाम करू शकतो.

मेघालय भाजपचे प्रमुख अर्नेस्ट मॉरी यांनी सांगितले की, मेघालय हे ख्रिश्चन बहुसंख्य राज्य आहे आणि भाजप सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना अधिक संरक्षण देईल. जर भाजप राज्यात सत्तेवर आला तर ते गोमांस खाणाऱ्या लोकांवर कोणतीही बंदी घालणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

नागालँडला पहिली महिला आमदार मिळणार का?

नागालँडमध्येही आज मतदान होत आहे. राज्यातील १३ लाखांहून अधिक मतदार चार महिला उमेदवारांसह एकूण १८३ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. येथे एकूण ६० जागा आहेत, मात्र यावेळी ५९ जागांवर मतदान होत आहे.  १९ अपक्षांसह १८४ उमेदवार रिंगणात आहेत. नागालँडचे पोलीस महासंचालक रुपिन शर्मा यांनी सांगितले की, नागालँडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या ३०५ कंपन्या आणि नागालँड पोलिसांच्या १५ बटालियनही तैनात करण्यात आल्या आहेत.
नागालँड राज्य होऊन जवळपास ६० वर्षे झाली आहेत, मात्र आजपर्यंत या राज्यात महिला आमदार नाही आहे.  यावेळी भाजपने एक, एनडीपीपीने दोन आणि काँग्रेसने एक महिला उमेदवार दिली आहे. यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की महिला आमदार होऊ शकणार की आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news