निवडणुकीपूर्वी त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये १४७ कोटींचा मुद्देमाल जप्त : निवडणूक आयोगाची माहिती | पुढारी

निवडणुकीपूर्वी त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये १४७ कोटींचा मुद्देमाल जप्त : निवडणूक आयोगाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्‍या कारवाईत १४८ कोटींचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आल्‍याची माहिती आज ( दि. १६ ) केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. २०१८ विधानसभा निवडणुकीच्‍या तुलनेत जप्‍त केलेली रक्‍कम ही २० पटीने अधिक आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्‍या सूत्रांनी सांगितले की, यंदा त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड  विधानसभा निवडणूक प्रचार काळात रोकड, विविध मौल्‍यवान धातू, मद्य, अंमली पदार्थ असा १४८ कोटींचा मुद्‍देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे. आयोगाने तीन राज्‍यांमधील ८० विधानसभा मतदारसंघांना संवेदनशील म्‍हणून वगीकृत केले होते. उमेदवारांच्‍या खर्चावर देखरेख ठेवण्‍यासाठी त्रिपुरामध्ये १९, मेघालयात २१ आणि नागालँडमध्ये २४ खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली असल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

त्रिपुरामध्‍ये आज ( दि.१६ )मतदान होत आहे तर नागालँड आणि मेघालयमध्‍ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तिन्‍ही राज्‍यातील मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.

 

 

Back to top button