shinde vs thackeray : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालयही शिंदे गटाला | पुढारी

shinde vs thackeray : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालयही शिंदे गटाला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं. आता विधानसभेपाठोपाठ संसदेतीलही कार्यालयही शिंदे गटाकडे गेल्याने आणखी एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे. वाचा सविस्तर बातमी. (shinde vs thackeray)

एकनाथ शिंदे यांच शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होत शिंदे -फडणवीस अशी युती झाली. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत वाद निर्माण झाला. त्यानंतर तो वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. अखेर शुक्रवारी (दि.१७) निवडणूक आयोगाने  निर्णय दिला की,”शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले.

दरम्यान विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालयही शिंदे गटाकडे गेले. संसद भवनातील १२८ क्रमांकाच्या खोलीत शिवसेनेचे कार्यालय आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निवाडा शिंदे गटाच्या बाजूने गेल्यानंतर या गटाने संसदेतील कार्यालयावर दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संसदेतले पक्ष कार्यालय आपल्या गटास दिले जावे, असे निवेदन शिंदे गटाकडून तीन दिवसांपूर्वी लोकसभा सचिवालयास देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत सचिवालयाने सदर कार्यालय शिंदे गटास दिले जात असल्याचे म्हटले आहे. याबाबत लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. लोकसभेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी राहुल शेवाळेंना याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा

Back to top button