Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी | पुढारी

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून (दि.२१) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर गेल्या आठवड्यातही या खटल्याच्या अनुषंगाने मॅरेथाॅन सुनावणी झाली होती. (Maharashtra Political Crisis)

सत्ता संघर्षाच्या खटल्याला अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण लागू होते का, याची पडताळणी करण्यासह मूळ खटल्याची सुनावणी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ करणार आहे. सत्ता संघर्षाचा खटला सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्याची ठाकरे गटाची विनंती गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे राहील, असा निवाडा अलिकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. या निर्णयाला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या याचिकांसोबत एकत्रपणे याही याचिकेची सुनावणी होणार काय, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा

Back to top button