उद्धव ठाकरे यांच्या मागणीला भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा पाठिंबा | पुढारी

उद्धव ठाकरे यांच्या मागणीला भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा पाठिंबा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हावर निकाल देण्यात घाई केली तसेच याबाबत चुकीचा निर्णय दिल्याचे सांगत निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे नेते असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रातील आपल्याच पक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण, त्यांचा अर्थ मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता’ असे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button