दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून न्यायालयाचा अवमान : मुख्यमंत्री केजरीवालांचा आरोप | पुढारी

दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून न्यायालयाचा अवमान : मुख्यमंत्री केजरीवालांचा आरोप

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) व्ही.के. सक्सेना यांनी न्यायालयाची अवमानना केल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि. १८ ) पत्रकार परिषदेतून केला. दिल्ली महानगर पालिकेतील महापौर निवडणूक गेल्या दोन महिन्यात तीनवेळा स्थगित करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल सुनावला होता. परंतु, सत्यता न्यायालयासमोर येऊ नये यासाठी एलजींनी प्रकरणाला घटनाबाह्यरित्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असल्‍याचेही केजरीवाल म्‍हणाले.

एमसीडी महापौर निवडणूक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. परंतु, भाजप आणि एलजी चुकीच्या पद्धतीने भाजप चा महापौर बनवण्याचा प्रयत्नात होते. सर्वोच्च न्यायालायाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला, असे केजरीवाल म्हणाले.

२२ फेब्रुवारीला बैठक बोलावण्याची मागणी ‘एलजी’कडे केली आहे. न्यायालयात सत्य पोहोचू नये यासाठी त्‍यांनी प्रयत्न केले. दिल्ली सरकार आणि एलजी दोघांना वेगवेगळे पक्षकार बनवले आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनाच दिल्ली सरकारचे वकील बनवण्यास सांगण्यात आले. तुमचा वकील देखील माझा वकील असावे, असे एलजी अधिकाऱ्यांना सांगतात.

अशात अधिकाऱ्यांकडून मेहता यांना वकील बनवण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. त्यामुळे दिल्ली सरकार आणि एलजींचा एकच वकील होता.अधिकाऱ्यावर बंदूक ठेऊन हे काम करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात ही बाब उघडकीस आली असती तर एलजी तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नसते, असे केजरीवाल म्हणाले.

फिल्मी स्टाईलमधे अधिकाऱ्याला धमकावून हे काम करण्यात आले, हा गुन्हा आहे. हे न्यायालयीन प्रक्रियेत बाधा घालण्यासारखे असल्याचे केजरीवाल म्हणाले. यासंदर्भात एलजी यांना पत्र लिहले असून, हे योग्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button