Manish Sisodia : सीबीआय चौकशीला मनिष सिसोदिया हजर राहणार ! | पुढारी

 Manish Sisodia : सीबीआय चौकशीला मनिष सिसोदिया हजर राहणार !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील आबकारी धोरण घोटाळा प्रकरणात उद्या, रविवारी सीबीआय उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी केली जाईल,अशी माहिती समोर आली आहे. (Manish Sisodia )
‘सीबीआयने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. माझ्या विरोधात सीबीआय, ईडीने संपूर्ण ताकद लावली आहे. घरी धाड, बँक लॉकर ची झाडाझाडती केली. परंतु, माझ्या विरोधात कुठेही काही मिळाले नाही. दिल्लीतील मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु यांना हे रोखायचे आहे. मी नेहमी तपासात सहकार्य केले आणि पुढेही करणार’ असे ट्वीट सिसोदिया यांनी आज केले आहे.
आबकारी धोरणात कथित घोटाळा झाल्याचा आरोप करीत सिसोदिया यांची यापूर्वी देखील चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडी देखील तपास करीत आहे. परंतु,आतापर्यंत कुठल्याही आरोप पत्रात सिसोदिया यांचे नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ईडीने आबकारी धोरणातील कथित घोटाळ्यात मनी लॉंड्रीग प्रकरणी सात कंपन्या विरोधात पूरक आरोपपत्र जानेवारी मधे दाखल केले होते. ईडीने दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात देखील उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सिसोदिया यांचे नाव होते.
हेही वाचा

Back to top button