Mahashivratri 2023 : उज्जैन उजळणार २१ लाख दिव्यांनी; गिनीज बुकात होणार नोंद | पुढारी

Mahashivratri 2023 : उज्जैन उजळणार २१ लाख दिव्यांनी; गिनीज बुकात होणार नोंद

उज्जैन; पुढारी ऑनलाईन : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले आहे की, महाशिवरात्री निमित्त उज्जैन शहर २१ लाख दिव्यांनी उजळून निघाणार आहे. उज्जैन शहरात शनिवारी (१८ फेब्रुवारी) महाशिवरात्री निमित्त २१ लाख दीप प्रज्वलीत केले जातील. ‘शिव ज्योती अर्पणम-२०२३’ कार्यक्रम अंतर्गत २१ लाख दीप प्रज्वलीत करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस करण्यात आला आहे. (Mahashivratri 2023)

अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली की, महाशिवरात्री निमित्त २१ लाख दीप प्रज्वलीत करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाशिवरात्री महोत्सव समितीची आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महोत्सवाच्या तयारीबाबत माहिती घेतली. यंदाची महाशिवरात्रीमध्ये २१ लाख दीप प्रज्वलीत करुन हा उत्सव दिवाळी प्रमाणे साजरा करु, अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी दिली. (Mahashivratri 2023)

उज्जैनमध्ये ज्योती अर्पणम कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणे जसे की, विविध मंदिरांमध्ये, व्यावसायिक ठिकाणांवर, घरा-घरांवर, चौका-चौकात आणि क्षिप्रा नदीच्या किनारी दीप प्रज्वलीत केले जातील. तसेच विविध ठिकाणी विद्युत राशनाईसह रांगोळीची सजावट केली जाणार आहे. (Mahashivratri 2023)

मागील वर्षी महाशिवरात्री निमित्त उज्जैनमध्ये ११ लाख ७१ हजार ०७८ दीप प्रज्वलीत करण्यात आले होते. तसेच २०२२ च्या दिवाळी मध्ये अयोध्यामध्ये १५.७६ लाख दीप प्रज्वलीत करुन वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला होता. यावेळी ज्योती अर्पणम कार्यक्रमाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हा कार्यक्रम ‘झीरो वेस्ट’ धरतीवर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २० हजार स्वयंसेवक या कार्यक्रमात भाग घेतील.


अधिक वाचा :

Back to top button