ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय | पुढारी

ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले असल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेची आत्ताची घटना ही लोकशाही विरोधी आहे. पक्षसंघटनेत कंपूगिरी करुन लोकांच्या नियुक्त्या केल्या जातात. नियुक्त्यांसाठी कोणत्याही निवडणूका घेतल्या जात नाहीत. अशा प्रकारची रचना असलेल्या पक्षात इतरांना विश्वास मिळू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राजकीय पक्षांची पदाधिकाऱ्यांच्या निवडणूकांना पारदर्शी पद्धतीने वाव देणारी असली पाहिजे आणि पक्षांतर्गत वादांची मोकळ्या पद्धतीने सोडवणूक झाली पाहिजे. घटनेतील अशा तरतुदी सहजासहजी बदल करता येऊ नयेत आणि जर असा बदल करायचा असेल तर पक्षसंघटनेतून मोठा पाठींबा असणे आवश्यक आहे.

Back to top button