Telangana Congress Ram Mandir Promise : तेलंगणा काँग्रेस हिदुंत्त्वाच्या वाटेवर? १०० मतदारसंघात उभारणार राम मंदिर

Telangana Congress Ram Mandir Promise : तेलंगणा काँग्रेस हिदुंत्त्वाच्या वाटेवर? १०० मतदारसंघात उभारणार राम मंदिर
Published on: 
Updated on: 

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीच्या सुमारे १० महिने आधी जनतेला आश्वासन दिले आहे की, जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर त्यांचा पक्ष राज्यातील १०० विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक राम मंदिर बांधण्याचा विचार करेल. ज्यामध्ये प्रत्येक मंदिर निर्मितीचा खर्च तब्बल १० कोटी रुपये इतका असेल. (Telangana Congress Ram Mandir Promise)

तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलम येथे काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोड़ो' यात्रेदरम्यान रेड्डी म्हणाले, "भद्राचलममध्ये राम मंदिर बांधले गेले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी मला सांगितले की, राज्यभरातील १०० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक राम मंदिर असावे, भद्राचलम हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे. येथे गोदावरीच्या किनारी रामाचे १७ व्या शतकात उभारण्यात आलेले प्राचीन मंदिर आहे. भद्राद्री नावाने हे तीर्थक्षेत्र ओळखले जाते. (Telangana Congress Ram Mandir Promise)

राम मंदिरावर १ हजार कोटी खर्च करण्याचा विचार (Telangana Congress Ram Mandir Promise) 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, काँग्रेस नेते ए रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, मंदिर बांधण्याच्या कल्पनेवर आम्ही नक्कीच विचार करु कारण ते तरुणांसाठी चांगले असेल. या उपक्रमासाठी १००० कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असे पहिल्यांदाच घडते आहे की या काळात एखाद काँग्रेस नेता मंदिराच्या मुद्द्यावर प्रथमच उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे. जेव्हा तेलंगणामध्ये येत्या डिसेंबर किंवा त्या ही आधी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरुन बोध घेत त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न असल्याचा रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडली

राम मंदिर बांधण्याचे आश्वासन देताना प्रदेश काँग्रेसचे प्रमुख रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर धार्मिक आधारावर समाजात फूट पाडल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "पीएम मोदी यांनी समाजात फूट पाडली आणि आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी समाजला जोडण्याचा प्रयत्न केला आहे."


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या