General MM naravane : 'तोपर्यंत भारत-चीन सीमेवर घटना होतच राहणार' - पुढारी

General MM naravane : 'तोपर्यंत भारत-चीन सीमेवर घटना होतच राहणार'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : General MM naravane : भारत आणि चीनच्या सीमेवरील घटना दोन्ही देशांमध्ये सीमा करार होईपर्यंत सुरू राहतील, असे लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे एका मेळाव्याला संबोधित करताना लष्करप्रमुख General MM naravane म्हणाले की, भारतीय लष्कर अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेऊन आमचे सैन्य रणनीती तयार करते.

चीनवर भाष्य करताना नरवणे म्हणाले की, चीनशी भारताचा सीमावाद अजूनही सुरू आहे. भूतकाळात ज्याप्रकारचा सामना करावा लागला त्याप्रमाणे आम्ही पुन्हा कोणत्याही प्रकारचा आव्हानांचा सामना करण्यास तयार आहोत. ते म्हणाले की, दीर्घकालीन उपाय सापडत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील आणि तो सीमा करार आहे. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत.

अफगाणिस्तानचा उल्लेख करताना नरवणे General MM naravane म्हणाले की भारतीय लष्कर किंवा सशस्त्र दल धोक्याच्या आकलनाचे वेळोवेळी मूल्यांकन करतात. त्या मूल्यांकनांच्या आधारे, भारतीय लष्कर भविष्यातील धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक रणनीती आणि तत्त्वे तयार करते, असे ते म्हणाले. ही एक अखंड प्रक्रिया आहे जी कधीही थांबत नाही.

ते म्हणाले की 15 ऑगस्ट रोजी काबूल तालिबानच्या हाती पडले. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करताना भारताने 20 सप्टेंबर रोजी म्हटले की, देशाच्या भूभागाचा वापर दहशतवादी कृत्यांना आश्रय, प्रशिक्षण, योजना किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाऊ नये.

नरवणे म्हणाले की, जोपर्यंत दहशतवाद्यांच्या धोक्याचा प्रश्न आहे, भारतीय लष्कर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे.
आमच्याकडे जम्मू-काश्मीरमध्ये अति गतिशील दहशतवादविरोधी ग्रीड आहे. ही एक गतिशील ग्रिड आहे आणि आपल्या शेजारी पाकिस्तानने शक्य तितक्या आतंकवाद्यांना आत ढकलण्याच्या प्रयत्नांवर बारीक नजर ठेवली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button