आयपीएल 2021 ( IPL 2021 ) चा दुसरा अंक सध्या युएईमध्ये सुरु आहे. या आयपीएलच्या जोरावरच प्रक्षेपणाचे हक्क असणारे स्टार इंडिया नेटवर्क सलग चौथ्या वर्षी 40 कोटी व्ह्युवर पार करण्याच्या मार्गावर आहे. आयपीएलच्या दुसऱ्या अंकात आतापर्यंत 35 सामने झाले आहेत तोपर्यंत या आयपीएलने स्टार इंडियाला 38 कोटी व्ह्युवर दिले आहेत. गतवर्षीचा आयपीएल 2020 मधील व्ह्युवरपेक्षा यंदा आतापर्यंत 1.2 कोटी जास्त व्ह्युवर मिळाले आहेत.
यंदाच्या आयपीएल हंगामात एकूण टीव्ही व्ह्युवर हे गेल्या तीन आयपीएल हंगामापेक्षा जास्त आहेत. आयपीएल 2021 ( IPL 2021 ) च्या दुसऱ्या अंकात स्टारची व्ह्युवर गुंतून राहण्याचा स्तर हा 32 टक्के राहिला आहे.
जसजसे आयपीएलचे दुसरे सत्र शेवटाकडे जात आहे तसेतसे रोमांचर सामन्यांची संख्या वाढणार आहे. प्ले ऑफमध्ये स्टार स्पोर्ट्सला अजून व्ह्युवरची संख्या काही कोटींनी वाढण्याची आशा आहे. याबाबत स्टार स्पोर्ट्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'आम्हाला अभिमान आहे की सलग चौथ्या वर्षी आम्ही 38 कोटी व्ह्युवर्स पर्यंत आयपीएल पोहचवले. गेले दोन हंगाम हे खास होते कारण ते सर्वसामान्य स्थितीत झाले नाहीत. आम्हाला आयपीएलच्या चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आपीएल अर्ध्यात थांबल्यानंतरही एक शक्यता चाहत्यांच्या मनात निर्माण होत होती. आम्ही ती 'असली पिक्चर अभी बाकी हैं' या आमच्या कॅम्पेनमध्ये उतरवली. आम्हाला वाटत होते की आयपीएलचे दुसरे सत्र अत्यंत चुरशीचे होणार आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यात टी20 वर्ल्डकप होणार आहे.'
आयपीएलच्या यशासाठी स्टार इंडियाने ग्राहकांचे त्याच्या भागानुसार वर्गिकरण करुन आपले कॅम्पेन केले. आयपीएलचे 8 संघ हे वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधित्व करतात. त्या प्रमाणेच स्टार इंडियाने आपली रणनीती आखली. याचबरोबर बायज्युस क्रिकेट लाईव्ह, क्रिकेट काऊंड डाऊन आणि गेम प्लॅन या कार्यक्रमांनी चाहत्यांना आयपीएलचे सर्वच अंगाने चांगले कव्हरेज दिले.
तसेच फ्रेंचायजी बेस नाईट क्लब, इनसाईड आरसीबी, द सुप किंग्ज शो, एमआय टीव्ही, ये हैं नई दिल्ली या सारख्या कार्यक्रमांनी संबंधित संघाचे फॅन फॉलोविंग वाढवले आणि त्यांना स्पर्धेकडे आकर्षित केले. आयपीएल 2021 ( IPL 2021 ) चा प्री मॅच प्रोग्राम सकट सगळा कार्यक्रम हा 24.2 कोटी मिनिटांचा आहे. अजून प्ले ऑफला सुरुवात व्हायची आहे. तर सहा संघ यासाठी अजून लढत आहेत. त्यामुळे 15 ऑक्टोबर पर्यंत हा आयपीएल फिव्हर अजून टिपेला पोहचणार आहे.
[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]