छत्तीसगडमधील कांकेर भागात पोलिस आणि नक्षलींमध्‍ये चकमक | पुढारी

छत्तीसगडमधील कांकेर भागात पोलिस आणि नक्षलींमध्‍ये चकमक

पुढारी ऑनलाईन: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज ( दि., १२ ) जोरदार चकमक झाली. सकाळी ७ आणि १० वाजता चकमकी झाल्या. चकमकीनंतर परिसरात शोध मोहिम सुरू असल्याची माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिली.

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटे बेठियाच्या अल्दंडच्या जंगलात परिसरात जिल्हा पोलिस आणि बीएसएफचे जवानाचे संयुक्‍त पथक गस्‍त घालत होते. यावेळी नक्षलींनी पथकावर अंदाधूंद गोळीबार केला.  कर्मचारी आणि नक्षलींमध्‍ये चकमक सुरू झाली.  या चकमकीत सुमारे चार ते पाच नक्षलवादी जखमी झाल्‍याचे समजते. सध्या परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अतिरिक्त फौजफाटाही घटनास्थळी तैनात केला असल्‍याचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले.

दोन नक्षलवाद्यांना अटक

अलीकडच्या काही दिवसांत बीएसएफ आणि डीआरजीच्या जवानांना मोठे यश मिळाले होते. यावेळी गस्तीवर असलेल्या जवानांनी आंबेडा परिसरातील मंडनार जंगलात 10 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली होती. जवानांनी नक्षलवाद्यांकडून वॉकी टॉकीज् आणि टिफिन बॉम्बसह मोठ्या प्रमाणात स्फोटकाचे साहित्यही जप्त केले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button