‘कांतारा’चे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले कौतुक! म्‍हणाले, “या चित्रपटाने…” | पुढारी

'कांतारा'चे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले कौतुक! म्‍हणाले, "या चित्रपटाने..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दाक्षिणात्‍य चित्रपट कांताराला ( kantara movie ) देशभरातील सिनेरसिकांची उत्स्फूर्त पसंती मिळाली. हा चित्रपट मागील वर्षीचा सवांत हिट चित्रपटांपैकी एक ठरला. आता या चित्रपटाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कौतुक केले आहे.

दक्षिण कन्‍नड सभेत बोलताना अमित शहा म्‍हणाले की, “कांतारा चित्रपट मी पाहिला. यामुळे मला दक्षिण कन्‍नड जिल्‍ह्यातील संस्‍कृतीची माहिती मिळाली. दक्षिण कन्‍नड जिल्ह्यातील धार्मिक परंपरा आणि सांस्‍कृतिक परंपरा जोपासल्‍या आहेत. कांतारा चित्रपटातून या समृद्ध परंपरेचे दर्शन मला झाले.”

कांतारा चित्रपट सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये प्रदर्शित झाला. मागील वर्षीची सुपरहिट चित्रपटात याचा समावेश होतो. ऋषभ शेट्टी याने अभिनयाबरोबर या चित्रपटाच्‍या दिग्‍दर्शनाचीही जबाबदारीही संभाळली होती. १६ कोटी रुपये निर्मिती खर्च आलेला या चित्रपटाने तब्‍बल ४०० कोटी रुपयांच्‍या अधिक कमाई केली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button