Turkey-Syria : गोठवणाऱ्या थंडीमुळे चिंता वाढली बळींची संख्या २१,००० वर

Turkey Earthquakes
Turkey Earthquakes
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: तुर्कस्थानातील Turkey-Syria शक्तीशाली भूकंपानंतर तुर्की आणि सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच आहे. यामध्ये आत्तापर्यंत हजारांहून अधिक लोकांचे भूकंपात बळी गेले आहेत. तुर्कीतील या शक्तीशाली भूकंपाला आज पाच दिवस म्हणजेच १०० तास ओलांडले तरी, अजूनही येथे ढिगाऱ्याखालून मोठ्या प्रमाणात मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तुर्कीतील गोठवणाऱ्या थंडीमुळे देखील चिंता आणखी वाढली असून, मृतांची संख्या २१००० वर गेली असून आणखी वाढण्याची भिती देखील वर्तवली जात आहे. आपत्तीची संपूर्ण व्याप्ती अद्याप अस्पष्ट असल्याचे संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात येत आहे.

या शक्तीशाली भूकंपामधून हजारो जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. परंतु भूकंपानंतर हे लोक जरी वाचले असले, तरी त्याच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नाही. या जीवघेण्या संकंटानंतरही त्यांना निवारा, वस्त्र,पाणी, इंधन, वीज यांसारख्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने थंडी देखील आहे. त्यामुळे वाचलेल्या अनेकांचे प्राण जाऊ शकतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

१ लाखांहून अधिक लोक बचावकार्यासाठी प्रत्यक्ष गुंतले आहेत. परंतु बचावकार्य करणाऱ्या या जवानांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणच्या जवानांना सोई सुविधा पुरवण्यासाठी वाहनांची कमतरता आणि रस्ते उद्ध्वस्त झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news