पत्रकार राणा अय्युब यांच्यावरील कारवाईला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा | पुढारी

पत्रकार राणा अय्युब यांच्यावरील कारवाईला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पत्रकार राणा अय्युब यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. गजियाबादच्या विशेष न्यायालयाने अय्युब यांना जारी केलेल्या समन्सवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ३१ जानेवारी पर्यंत विशेष न्यायालयाला अय्युब यांच्यावरील कारवाई स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका प्रकरणात विशेष न्यायालयाने अय्युब यांना २७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अय्युब यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली होती. गजियाबाद विशेष न्यायालयाच्या समन्स विरोधात अय्युब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत अय्युब यांना समन्स बजावला होता.

ऑनलाईन क्राऊड फंडिंग प्लेटफॉर्म ‘केटो’च्या माध्यमातून अभियान राबवत ‘चॅरेटी’च्या नावावर सर्वसामान्य नागरिकांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याचा आरोप अय्युब यांच्यावर करण्यात आला आहे. हा निधी अय्युब यांचे वडील तसेच बहिणीच्या बँक खात्यात वळता करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. अय्युब यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर ५० लाखांची एफडी देखील बनवली होती. तर, चॅरेटी साठी २९ लाख रुपयांचा वापर केला होता.

 हेही वाचा :

 

 

Back to top button