Jacqueline Fernandez : दुबईला जाण्यासाठी परवानगी द्या; जॅकलिन फर्नांडिसची न्यायालयात विनंती याचिका | पुढारी

Jacqueline Fernandez : दुबईला जाण्यासाठी परवानगी द्या; जॅकलिन फर्नांडिसची न्यायालयात विनंती याचिका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दुबईला जाण्यासाठी परवानगी देण्याच्या विनंतीची याचिका अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) बुधवारी पटियाला हाउस न्यायालयात दाखल केली. २७ ते ३० जानेवारी दरम्यान पेप्सिको कंपनीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी दिली जावी, असे जॅकलिनने याचिकेत म्हटले आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर याच्या हवाला प्रकरणात जॅकलिनचा (Jacqueline Fernandez) सक्रिय सहभाग असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. त्यावरुन तिची मागील वर्षभरात अनेकदा चौकशी झालेली आहे. दरम्यान, जॅकलिनच्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी सक्तवसुली संचलनालयाने वेळ मागितला असून न्यायालयाने सुनावणी २७ तारखेपर्यंत तहकूब केली आहे. जॅकलिनने याआधीही अनेकदा विदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याच्या विनंतीचे अर्ज न्यायालयाकडे दाखल केले होते. काही दिवसांपूर्वी तिने बहरिनला जाण्यासाठी परवानगी दिली जावी, असा अर्ज दिला होता. मात्र तपास संस्थांनी जॅकलिनच्या विदेश प्रवासाला विरोध केला होता.

Back to top button