पुढारी ऑनलाईन डेस्क : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "राहुल गांधी पप्पू आहेत, अशी टीका होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना खूप विषयांवर अभ्यासपूर्ण माहिती आहे. राहुल गांधी हे स्मार्ट आणि समजुतदार नेते आहेत. ."
रघुराम राजन हे डिसेंबर २०२२ मध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांची पप्पू अशी टीका करणं. हे अत्यंत दुर्देवी आहे. राहुल यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात मी एक दशक घालवले आहे. ते एक स्मार्ट आणि जिज्ञासू व्यक्ती आहेत. खरतरं आपल्या एखाद्या गोष्टीची प्राथमिकता आणि प्राधान्य माहित नसते. आपल्याला प्राधान्य काय आहे हे माहित असले पाहिजे, मला वाटते की राहुल गांधी यांना या सगळ्याची पूर्ण जाणीव आहे.
रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यानंतर रघुराम राजन (Bharat Jodo Yatra) राजकारणात प्रवेश करतील, असा अंदाजही व्यक्त होत होता. राजन यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाच्या अफवांना फेटाळून लावले आहे. याबाबत ते म्हणाले की, मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. भारत जोडा यात्रा ज्या ध्येय आणि विचारांच्या आधारावर काढण्यात आली त्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो. मी राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा होतो; पण मी राजकारणात येणार नाही. राजन यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलत असताना म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळातही मी अनेक मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात बोललो आहे.
हेही वाचा :